विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 29 वर्षांची नोकरी आणि बदल्या मात्र आतापर्यंत 54 झाल्या आहेत.काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेर यांच्या जमिनीचा घोटाळा उघड केल्यानंतर खेमका चर्चेत आले होते.हरियाणात काँग्रेस सरकार असताना त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या होत्या.29 years of job and transfers so far 54, Ashok Khemka again removed
आता त्यांची ५४ व्या वेळी बदली झाली आहे. हरयाणा सरकारने बदलीचे कारण दिलेले नाही. ते सध्या पुरातत्त्व, पुरातत्व आणि संग्रहालय विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली हरयाणाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे.
अशोक खेमकांच्या २९ वर्षांच्या कारकीर्दीत ५४ वेळा बदलीला सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी I खेमका यांची एक वर्ष अकरा महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होते.शिलाकारी, मंगर, कोट, धौज आणि नूरपूर, धुमसापूर आणि गुडगाव या प्रदेशात येणारे पुरातन स्थळ आणि आश्रयस्थान आहेत.
याच्या शोधावर खेमका यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. रोझका-गुर्जर आणि कोटवर व्यावसायिकांचा डोळा आहे. तर दमदमा, धौज आणि शिलाकारीमध्ये खाण कंपन्याची नजर आहे, असं खेमका म्हणाले होते.
जर PLPA कायद्याच्या कलम ४,५ अंतर्गत येणारे डोंगर, जंगलं आणि अरवलीची शेती असलेले क्षेत्राचा कलम ४ च्या अधिसूचनेत समावेश नसेल तर खासगी व्यावसायिक आणि खाणींवर अतिक्रमण होईल.
यामुळे सार्वजनिक हितासाठी पुरातन स्थळं आणि आश्रयस्थानांचं नैसर्गिक संरक्षण करणं शक्य होणार नाही. एनसीआर क्षेत्रातील व्यावसायिक हितसंबंध अरावलींचा अकाली विनाश करतील, असा इशारा अशोक खेमका यांनी हरयाणा सरकारला दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App