विरोधकांची शेतकरी आंदोलनाला हवा; सरकारने पकडली पाम लागवडीची दिशा!!; 28 लाख हेक्टरवर पाम लागवड करणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनाला हवा दिली आहे. शेतकरी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासंदर्भात वेगळे पाऊल उचलत देशात पाम लागवड वाढविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. शेतकऱ्यांसाठी स्व विकासाचे एक नवे दालन यानिमित्ताने उघडले जात आहे.28 lakh hectare farmland is suitable for palm oil cultivation across India, out of which 9 lakh hectare land is in Northeast.

देशात तेलबिया उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने आखला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पाम लागवड हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देशात 28 लाख हेक्टर जमीन पाम लागवडीसाठी उपयुक्त असल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

28 लाख हेक्टर जमिनीपैकी काही लाख हेक्टर जमीन ईशान्येकडील राज्यांमध्ये उपलब्ध आहे, तर उर्वरित जमीन अंदमान निकोबार बेटांवर उपलब्ध आहे. या जमिनीवर टप्प्याटप्प्याने पाम वृक्षांची लागवड करून पाम तेलाचे उत्पादन देशातच वाढविण्यात येईल. यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देखील उपलब्ध करून देईल, असे तोमर यांनी स्पष्ट केले आहे. तेलबिया उत्पादनाच्यादृष्टीने देश स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणखीही महत्त्वाची पावले सुतोवाच तोमर यांनी केले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहेच त्याचबरोबर शेतकऱ्यांना तेलबिया उत्पादन वाढ तसेच पाम वृक्ष लागवड या नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची द्वारे सरकारने खुली करून दिली आहेत.

28 lakh hectare farmland is suitable for palm oil cultivation across India, out of which 9 lakh hectare land is in Northeast.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात