वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरूमध्ये सुरू होत आहे. यात 26 पक्ष सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले.26 parties gathered for opposition unity, 38 parties participated in NDA meeting today
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी चार्टर प्लेनने दुपारी बंगळुरूला पोहोचले. सोनिया आज सायंकाळी नेत्यांसाठी डिनर होस्ट करणार आहेत.
बैठकीसाठी महबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, ममतांसह अनेक नेते पोहोचले आहेत. तर शरद पवारही उद्या थेट बैठकीसाठी हजर होतील. पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळेही येणार आहेत.
दुसरीकडे, भाजपनेही 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये NDA ची बैठक बोलावली आहे. अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, या बैठकीत 38 पक्ष सहभागी होत आहेत.
NDA च्या बैठकीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटले- मला आश्चर्य आहे की, मोदीजींनी राज्यसभेत म्हटले होते की, मी एकटा सर्व विरोधकांवर भारी आहे.
जर ते एकटे विरोधकांवर भारी आहेत, तर उद्या NDA च्या बैठकीसाठी 30 पक्षांना का बोलावत आहेत. त्या 30 पक्षांचे नाव तर सांगा. ते आमच्या बैठकीने घाबरले आहेत.
तेलंगणा CM के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे CM जगन मोहन रेड्डी, आंध्रचे माजी CM चंद्रबाबू नायडू आणि ओडिशाचे CM नवीन पटनायक यांनी या बैठकीपासून अंतर राखले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पहिला- लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट, दुसरा जागा वाटप आणि तिसरा- यूपीएचे नवे नाव.
याशिवाय समान नागरी संहिता, मणिपूर हिंसाचार, 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका, पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती आणि त्याच्या काउंटर प्लॅनवरही चर्चा होणार आहे.
8 नवीन पक्ष मिळून 26 पक्षांचे नेते सामील होण्याची शक्यता
पाटणा येथे झालेल्या बैठकीत 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या वेळी विरोधी गट आणखी मजबूत करण्यासाठी आणखी 8 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK), कोंगू देसा मक्कल काची (KDMK), विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), केरळ काँग्रेस (जोसेफ) यांचा समावेश आहे. केरळ काँग्रेस (मणी) यांनी सहमती दर्शवली आहे. या नवीन पक्षांपैकी KDMK आणि MDMK हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मित्र होते.
विरोधी ऐक्याच्या पहिल्या बैठकीत जनता दल युनायटेड (JDU), राष्ट्रीय जनता दल (RJD), आम आदमी पार्टी (AAP), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), तृणमूल काँग्रेस (TMC), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीएम, सीपीआय (एमएल), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), एसपी, जेएमएम आणि एनसीपी सामील झाले होते.
काय आहे सद्य:स्थिती?
विरोधी पक्ष आणि एनडीएच्या बैठकीत एकूण 64 पक्ष सहभागी होत आहेत. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 37 पक्षांच्या नेत्यांनाच विजय मिळवता आला. सध्या देशातील ६ पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे, तर ५४ पक्षांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. याशिवाय, असे 2,597 पक्ष आहेत जे केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत, परंतु कमी मतांमुळे त्यांना मान्यता मिळालेली नाही.
भाजपने आज एनडीएच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व 38 पक्षांची नावे जाहीर केलेली नाहीत, परंतु सध्या एनडीएकडे लोकसभेच्या 543 पैकी 331 जागा आहेत. ज्यामध्ये भाजपच्या 307 जागा आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App