विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार संशयाचे पडळ घेऊनच आज बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होत आहेत. राष्ट्रवादी फुटली. अजित पवार त्यांच्या 8 सहकाऱ्यांसह शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात सामील झाले. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. पण गेल्या तीन दिवसांमध्ये पवारांनी सातत्याने अजित पवारांसह बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या. इतकेच नाहीतर पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा देखील केली.Sharad Pawar at the meeting of the opposition unity in Bangalore today
या सर्व घडामोडींमुळे शरद पवार यांच्याभोवती संशयाचे पडळ तयार झाले आहे. विशेषतः काँग्रेस नेत्यांमध्ये शरद पवारांच्या राजकीय कृती विषयी संशय तयार झाला आहे. यशोमती ठाकूर यांच्या मुखातून ही नाराजी बाहेर आली. शरद पवार आणि अजित पवार ही भेट काँग्रेस मधल्या कोणाला आवडलेली नाही. शरद पवार आपली मूळ भूमिका कायम ठेवून लोकशाही बरोबर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. पण ते नेमके काय करतील??, याची कोणालाच खात्री देता येत नाही, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले. बंद खोलीत काय चर्चा झाली हे लवकरच बाहेर येईल, असा टोला विश्वजीत कदम यांनी हाणला.
उद्धव ठाकरेंची नाराजी
त्याचबरोबर कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विरोधी ऐक्याच्या बैठकीत बंगलोर मध्ये सामील झाले आहेत. त्यांनी तर उघडपणे संजय राऊत यांच्यापाशी पवारांच्या दुटप्पी भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊत शरद पवारांशी बोलले आणि पवार आजच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होणार असल्याचे त्यांनी नंतर सांगितले.
डबल गेमची शंका, काँग्रेस सतर्क
त्याचबरोबर शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ या संघर्षात काँग्रेसला महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढीची संधी आहे हे लक्षात घेऊन काम करण्याच्या सूचना राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या सर्व काँग्रेस नेत्यांना दिल्या.
या पार्श्वभूमीवर आपल्या भोवती संशयाचे पडळ घेऊन शरद पवार बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होत आहेत. तेथे प्रत्यक्ष काय चर्चा होईल आणि सर्व विरोधक मिळून मोदी विरोधात कोणता फॉर्म्युला बाहेर काढतील??, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण एकीकडे पुतण्याला भाजपबरोबर सत्तेची फळे चाखायला पाठवून दुसरीकडे शरद पवार विरोध ऐक्याच्या बैठकीत सामील होत असल्याने काँग्रेस नेत्यांना त्यांच्या डबल गेम विषयी दाट शंका आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more