वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसने मिशन गुजरातवर लक्ष केंद्रित केले असून गुजरातमध्ये बड्या काँग्रेस नेत्यांच्या येत्या 15 दिवसांत 25 सभांचे आयोजन केले आहे. यामध्ये 125 विधानसभा मतदारसंघ विशेष टार्गेटवर असतील. 25 meetings of senior leaders in 15 days; 125 constituencies on target
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रात आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी गेले नव्हते, मात्र ते गुजरातमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक गेहलोत, भूपेश बघेल असे दोन मुख्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी, यांच्याशिवाय पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक वर्गातील मोठे नेतेही येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये सभांचा धडाका लावतील.
2017 च्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी राज्यात पक्षाचे नेतृत्व केले होते. यामुळे काँग्रेसने भाजपला दोन अंकी म्हणजेच ९९ इतक्या संख्येवर आणून ठेवले होत. तर काँग्रेसने 87 मतदारसंघात विजय मिळवला होता. ही गेल्या तीन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी होती. यावेळी मात्र काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत बूथ व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करत आपली रणनीती बदलली आहे.
राहुल गांधी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये द्वारका येथील राज्यस्तरीय चिंतन शिबिर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली; त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने ‘मूक प्रचार’ योजना राबवली. शिवाय, काँग्रेसने यावेळी मोठ्या प्रमाणात घरोघरी प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App