2400 कोटींच्या ड्रग्जची होळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले व्हर्चुअल निरीक्षण, अमली पदार्थांविरुद्ध झीरो टॉलरन्स


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी बंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागांत 1,235 कोटी रुपयांचे 9,298 किलो ड्रग्ज जाळण्यात आले.2400 Crore Drug Holi, Union Home Minister Amit Shah Conducts Virtual Inspection, Zero Tolerance Against Drugs

अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यावर लक्ष ठेवले. या परिषदेत राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि कर्नाटक सरकार यांच्यात शिवमोग्गा येथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

परिषदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने अमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे.



75 दिवसांत 8409 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 1 जून 2022 पासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला. ज्या अंतर्गत 75 दिवसांच्या मोहिमेत 75,000 किलो ड्रग्ज नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तथापि, आम्ही आतापर्यंत 8,409 कोटी रुपयांचे 5,94,620 किलो ड्रग्ज नष्ट केले आहेत, जे लक्ष्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यापैकी 3,138 कोटी रुपयांचे (1,29,363 किलो) ड्रग्ज एकट्या एनसीबीने नष्ट केले आहेत.

अंमली पदार्थांची तस्करी ही राष्ट्रीय समस्या

अमित शहा म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी ही केवळ राज्य किंवा केंद्राची नसून ती राष्ट्रीय समस्या आहे. याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करण्याची गरज आहे. देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे संपूर्ण रॅकेट आहे, त्याचा छडा लावण्यासाठी तपास करण्याची गरज आहे.

शहा यांनी माहिती दिली की 2006 ते 2013 दरम्यान देशात अंमली पदार्थांच्या तस्करीचे 1257 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी 2014 ते 2022 मध्ये 152% ने वाढून 3172 झाली. तर, 2006 ते 2013 दरम्यान, 1362 पासून 4888 पर्यंत अटकेत 260% वाढ झाली.

2006 ते 2013 दरम्यान 1.52 लाख किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, जे 2014 ते 2022 दरम्यान दुप्पट होऊन 3.30 लाख किलो झाले. 2006 ते 2013 या कालावधीत 768 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते, जी 2014 ते 2022 या काळात 25 पटीने वाढून 20,000 कोटी रुपयांवर गेली.

2400 Crore Drug Holi, Union Home Minister Amit Shah Conducts Virtual Inspection, Zero Tolerance Against Drugs

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात