चीनचे परराष्ट्रमंत्री अज्ञातवासात, टीव्ही अँकरशी अफेअरमुळे हटवल्याची शक्यता, डिसेंबरमध्ये स्वीकारला होता पदभार


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनचे परराष्ट्र मंत्री किन गेंग यांना पदावरून हटवल्याची बातमी समोर येत आहे. पाश्चात्य मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की गेंग यांचे एका प्रसिद्ध चीनी टीव्ही अँकरसोबत अफेअर होते, त्यामुळे त्यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे.China’s foreign minister in limbo, likely removed over affair with TV anchor, assumed office in December

25 जून रोजी गेंग यांनी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हापासून ते सार्वजनिक व्यासपीठावर दिसले नाही. 57 वर्षीय गेंग यांच्याबद्दल चिनी मीडिया सांगत आहे की ते आजारी आहेत. मात्र, पाश्चात्य प्रसारमाध्यमे वेगळीच कथा सांगत आहेत.8 महिन्यांपूर्वी परराष्ट्रमंत्री झाले

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टाईम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गेंग यांना पदावरून हटवण्यात आले असून, त्यांची खराब प्रकृती यामागे कारण देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार- आक्रमक मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या 57 वर्षीय गेंग यांचे चीनच्या 40 वर्षीय टीव्ही प्रेजेंटर फू झियाओटियानसोबत अफेअर आहे. या प्रकरणामुळे आपली बदनामी होत असल्याची कम्युनिस्ट पक्षाची भावना आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की गेंग यांच्या अफेअरची पुष्टी झाल्यानंतर त्यांना आधी बाजूला करण्यात आले आणि नंतर काढून टाकण्यात आले. यामुळेच ते कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नाही. डिसेंबरमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता.

जिओटियनने काही काळापूर्वी गेंग यांची मुलाखत घेतली होती. यानंतरही ती अनेकवेळा गेंगसोबत दिसली. स्थानिक सोशल मीडिया नेटवर्कवर गेंग यांच्या अफेअरच्या बातम्या आल्यावर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने याची पुष्टी करण्यास नकार देत परराष्ट्रमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याचे गेल्या आठवड्यातच सांगितले. गेल्या आठवड्यात जकार्ता येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाही.

China’s foreign minister in limbo, likely removed over affair with TV anchor, assumed office in December

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात