वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील चार शाळांमध्ये २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे पुन्हा कोरोना संक्रमण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. 23 students in four schools in Uttar Pradesh Corona infected; Corona infection at Noida
गेल्या ३ दिवसांत ४ शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगरमध्ये गेल्या तीन दिवसांत चार शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.
सीएमओ सुनील कुमार शर्मा म्हणाले, “सध्या घाबरण्याचे काहीच नाही, आमची कृती पथके विद्यार्थ्यांचे घरोघरी जात असून आणखी काही जण संक्रमित झाले आहेत का ? याचा शोध घेत आहेत.”आम्ही फक्त लक्षण असलेल्या लोकांची चाचणी घेत आहोत.” असे त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App