वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीतील २२ आरोपींना स्थानिक पंचमहल कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 22 accused in Gujarat riots acquitted after 21 years
गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा रेल्वे स्थानकावर २८ फेब्रुवारी २००२ रोजी स्थानिकांनी साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावली होती. या बोगींमध्ये अयोध्येहून परतणारे कारसेवक प्रवास करीत होते. या घटनेत ५९ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून राज्यात दंगल उसळली होती. यात पंचमहल जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात २२ जणांना आरोपी बनवण्यात आले होते.
हिमाचल काँग्रेस : आधी धाकधूक, नंतर फुटाफुटीची शंका आणि आता मुख्यमंत्री पदाची स्पर्धा
या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील गोपाल सिंह सोलंकी यांनी सांगितले की, गोध्रा घटनेनंतर हालोल गावात उसळलेल्या दंगलीत १७ जणांची हत्या झाली होती. यात २२ जणांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी २४ जानेवारी २०२३ रोजी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचे ऍड्. गोपाल सिंह सोलंकी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App