वृत्तसंस्था
सिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी सिमल्याच्या जाहीर सभेत सभेतून संवाद साधला. त्याच वेळी देशातील तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदींनी 21000- कोटी रुपयांचा किसान सन्मान निधी थेट जमा केला. 21000 crore Kisan Samman Nidhi deposited in the accounts of 10 crore farmers
Addressing 'Garib Kalyan Sammelan' in Shimla. Watch. https://t.co/XEekMT4DYQ — Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
Addressing 'Garib Kalyan Sammelan' in Shimla. Watch. https://t.co/XEekMT4DYQ
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारच्या अष्टवर्षपूर्तीचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. सिमल्यातल्या रिज्ड मैदानावर त्यांनी मोठी रॅली घेतलीच, पण त्या रॅली मधूनच त्यांनी देशभरातल्या पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद देखील साधला. त्याआधी पंतप्रधानांनी सिमला विमानतळ ते रिज्ड मैदान असा मोठा रोड शो केला. त्याला हिमाचल प्रदेशाच्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. शिंपल्यातील राहिलीत पंतप्रधानांनी सरकारच्या योजनांचा आढावा तर घेतलाच त्याचबरोबर अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचे सूतोवाच देखील त्यांनी केले.
भारतातली जनता आधी केंद्रीय योजनांकडे “अटकी लटकी स्कीम” अशा स्वरूपात बघत होती. परंतु आता जनता स्वतःहून पुढे येऊन केंद्रातल्या योजना कशा लाभदायक आहेत, असे सांगत आहे. कारण आता केंद्र सरकारने या योजनांमध्ये मध्यस्थ काढून टाकून सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत गरीब कल्याण योजना पोहोचवल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेपासून ते प्रधानमंत्री आवास योजने पर्यंत अनेक योजनांचे लाभ देशातल्या कोट्यावधी जनतेला मिळाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App