वृत्तसंस्था
कोटा : कोटा येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अभ्यासाच्या दडपणाखाली असलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यात महाराष्ट्रातील लातूरच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमध्ये परीक्षा घेण्यास बंदी घातली आहे. सध्या ही बंदी दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. 2 students suicide in 5 hours in Kota; Including a 16-year-old student from Latur, jumped from the sixth floor
एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, तर दुसऱ्याने फाशी घेतली
पोलिस अधिकारी भागवतसिंह हिंगड म्हणाले की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लातूर येथील 16 वर्षीय आविष्कार संभाजी कासले याने कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात अविष्कार 3 वर्षांपासून राहत होता. तो इथे NEET ची तयारी करत होता. रविवारी रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेसाठी आला होता.
तर कुन्हडी येथील लँडमार्क परिसरात राहणारा विद्यार्थी आदर्श (18) हा सायंकाळी 7 वाजता खोलीत फाशी घेतलेल्या आढळून आला. आदर्श बिहारमधील रोहिताश्व जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थी NEET च्या तयारीसाठी 4 महिने आधीच कोटा येथे आला होता. येथील लँडमार्क परिसरात तो भाऊ आणि बहिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत होता.
जेवणासाठी बोलावले पण उत्तर मिळाले नाही…
पोलिस म्हणाले की, फ्लॅटमध्ये तीन स्वतंत्र खोल्या आहेत. रविवारी परीक्षा दिल्यानंतर आदर्श त्याच्या खोलीत गेला होता. सायंकाळी 7 वाजता बहिणीने त्याला जेवणासाठी बोलावले, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने चुलत भावाला फोन केला.
दोघांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला, पण उत्तर मिळाले नाही. यानंतर दोन्ही भावंडांनी दरवाजा तोडला. आदर्श फासावर लटकलेला पाहून दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी माहिती दिली. यानंतर, त्याला खाली काढल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला वाचवण्यासाठी सीपीआर देण्यात आला, मात्र त्याला वाचवता आले नाही.
कमी मार्कचा तणाव
पोलिसांनी सांगितले की-कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टेस्टमध्ये आदर्शला सतत कमी मार्क येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 700 पैकी त्याला फक्त 250 गुण मिळवता आले. याची त्याला काळजी वाटत होती. यामुळे त्याने गळफास घेतल्याचे समजते. एएसपी म्हणाले – आतापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पालक आल्यानंतर खोलीची झडती घेतली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App