Rajya Sabha : YSRCPच्या 2 राज्यसभा खासदारांचा राजीनामा; TDP मध्ये सामील होण्याची शक्यता

Rajya Sabha

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वायएसआर जगन मोहन रेड्डी ( YS Jagan Mohan Reddy ) यांच्या वायएसआरसीपी पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांनी गुरुवारी (29 ऑगस्ट) पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला. मोपीदेवी वेंकटरामन आणि बेदा मस्तान राव यांनी आपले राजीनामे उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे सुपूर्द केले.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वायएसआरसीपीला हा मोठा धक्का आहे. दोन्ही नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. या खासदारांच्या जाण्यानंतर वायएसआरसीपीकडे राज्यसभेत 9 आणि लोकसभेत 4 खासदार शिल्लक राहतील.



दोन्ही नेते टीडीपीमध्ये सामील होण्याची शक्यता

मोपीदेवी वेंकटरामन 2020 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले आणि त्यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत होता. वेंकटरामन यांनी जगन मोहन रेड्डी यांचे वडील दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले होते. 2019 मध्ये वेंकटरामन TDP मधून YSRCP मध्ये सामील झाले. तर बेदा मस्तान राव 2022 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले आणि त्यांचा कार्यकाळ जून 2028 मध्ये संपणार होता. राव यांनी काँग्रेस पक्षातून वायएसआरसीपीमध्ये प्रवेश केला होता. आता हे दोन्ही नेते टीडीपीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नायडूंचा टीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. TDP ने लोकसभेच्या 25 पैकी 16 आणि विधानसभेच्या 175 पैकी 135 जागा जिंकल्या आहेत, याचा अर्थ आता आंध्रच्या राजकारणाची आणि विकासाची चावी चंद्राबाबू नायडूंकडे परत आली आहे.

2 Rajya Sabha MPs of YSRCP resign; Possibility of joining TDP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub