प्रतिनिधी
मुंबई : अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि भारतातला संघ परिवार यांची अस्थानी तुलना करणाऱ्या बॉलिवूड गीत गीतकार संवाद लेखक जावेद अख्तर यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर सगळीकडून टीकेचा भडिमार होत असताना त्यांच्या बाजूने महाराष्ट्रातल्या 150 लिबरल्सनी जमावडा तयार केला आहे.
महाराष्ट्रातल्या 150 लिबरल्सनी जावेद अख्तर यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. असाच पाठिंबा त्यांनी बॉलीवूड अभिनेते नसरुद्दीन शहा यांना दिला आहे.
जावेद अख्तर यांनी सुरुवातीला अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीवर टीका करून घेतली, परंतु त्यानंतर त्यांनी भारतातल्या संघ परिवाराशी तालिबानची तुलना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची मानसिकता तालिबानी आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यावर संघ परिवाराकडून तसेच समाजातील अन्य घटकांकडून देखील जावेद अख्तर यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता. जावेद अख्तर यांनी तालिबान आणि संघ परिवाराची केली तुला अस्थानी आहे. तालिबान ज्या प्रकारे हिंसाचार घडवते शरिया कायदा अफगाणिस्तानातल्या लादते. अशा पद्धतीचा कायदा संघ परिवार भारतात लागू करू इच्छित नाही. संघ परिवार अशा तालिबानच्या पद्धतीचा हिंसाचारही घडवत नाही, असे अनेकांनी जावेद अख्तर यांना सुनावले. जावेद अख्तर यांचा वेळीच प्रतिकार झाल्यानंतर 150 लिबरल्सचा जमावडा त्यांच्या भोवती तयार झाला आहे. त्यांनी जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
मोदी सरकार केंद्रात पुन्हा आल्यानंतर अवॉर्ड वापसीचे नाटक रंगवण्यात आले होते. भारतात असहिष्णू वातावरण तयार झाले आहे, असे असा धोशा लावण्यात आला होता. तो ज्यांनी लावला तेच लिबरल आता जावेद अख्तर यांच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत.
150 लिबरल्सच्या जमावडा झाल्याचे मराठी माध्यम मधले रिपोर्टिंग आहेत अशाच प्रकारचे आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीसंदर्भात बोलताना प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी जी स्पष्ट निरीक्षणे नोंदवली, त्यावरून अख्तर यांना संघ तसेच भाजपप्रणीत संघटनांकडून रोषाला सामोरे जावे लागते आहे. त्यांना ज्या प्रकारे धमकावले जाते आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील 150 मान्यवर विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे, असे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केले आहे
त्यांचा मताधिकार जपला गेला पाहिजे, याबद्दल आग्रही असल्याचे नमूद करत जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद के ले आहे. तिस्ता सेटलवाड, अमिर रिझवी, आनंद पटवर्धन, अंजुम राजाबाली अशा मान्यवरांचा यात सहभाग आहे.
ख्रिश्चन, शीख, हिंदू असो वा मुस्लीम असोत, जगभरातील सर्व उजव्यांच्या विचारसरणीत समानता आहे. कु टुंबात वा समाजात स्त्रियांचे त्यांच्या दृष्टीने काय स्थान आहे, याबाबतीत त्यांची मते जाहीरपणे व्यक्त केली जातात तेव्हा त्यांची ही कडवी मानसिकता अधिकच स्पष्ट होते. तालिबान्यांची मानसिकता अधिकच हिंसक आणि टोकाची आहे आणि गेल्या काही वर्षांत संघ परिवाराकडून होणाऱ्या अशा हिंसक घटनांकडेही ‘हिंदू तालिबान’ म्हणूनच पाहिले जाऊ लागले आहे, इतक्या स्पष्ट शब्दांत या पत्रात सद्य:परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. जावेद अख्तर यांच्या मुलाखतीवरून उठलेला वादंग आणि त्याचवेळी नसीरुद्दीन शाह यांच्या जुन्या मुलाखतीची चित्रफित समाजमाध्यमांवर येणे या दोन्ही घटनांमधील योगायोग दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
शाह यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून मुस्लीम समाजाकडूनच त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. भारतीय इस्लाम हा जगभरातील इस्लामी धर्मविचारांपेक्षा वेगळा आहे. आपल्याला आपल्या धर्मात आधुनिक विचार आणि सुधारणा हव्यात की कर्मठ धर्मविचार वाढवायचा आहे? याचा विचार व्हायला हवा, असे मत शाह यांनी व्यक्त केले होते.
शाह यांचे हे वक्तव्य आणि जावेद अख्तर यांनी व्यक्त केलेली मते यातून महत्त्वाचे विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याकडे लक्ष वेधत त्यांना आपला पाठिंबा असल्याची भूमिका या लिबरल्सनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App