ISIS मोड्यूलच्या म्होरक्यांनी पडघा गाव केले “स्वतंत्र”, नाव दिले होते, “अल् शाम”; NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा!!


वृत्तसंस्था

मुंबई : देशात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करत हिंसाचाराचे थैमान घालण्याचा इरादा राखून असलेल्या ISIS आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर काळ ठाणे, पुण्यात तब्बल 44 ठिकाणी छापे घातल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था NIA ने 15 जणांना अटक केली आणि त्यांच्या तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे या सर्व जिहादी दहशतवाद यांनी ठाणे जिल्ह्यातील पडघा – बोरिवली गावाला परस्पर “स्वातंत्र्य” जाहीर करून त्याचे नामांतर “अल् शाम” असे केले होते. तेथे देशातल्या इतर प्रांतांमधून जिहादी तत्वांच्या मुस्लिम युवकांना आणून स्थायिक करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची त्यांची घातक योजना सुरू होती. देशात ठिकठिकाणी अशी “स्वतंत्र” गावे आणि नंतर राज्य निर्माण करण्याचा त्यांचा इरादा NIA च्या तपासातून उघडकीस आला आहे. NIA च्या अधिकृत प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.15 Isis terrorists arrested: Accused had ‘declared’ Maharashtra village ‘liberated zone’, says NIA

भिवंडीतल्या पडघा गावात एकाच वेळी एनआयएने केलेल्या कारवाईत १५ जणांना अटक केली. घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचण यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांना अटक केली.NIA ने ISIS मॉड्यूलशी सबंधित महाराष्ट्रात मोठे ऑपरेशन केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून एकूण 44 ठिकाणी छापे घातले. 15 जणांना अटक केली.

छाप्यांमध्ये काय सापडले??

भिवंडीमधील पडघा बोरिवली गावात तसेच ठाणे शहर, पुणे, मीरा भाईंदर आणि अंधेरीतील कार्गो एयरपोर्ट परिसरात छापेमारी केली. या कारवाईत 68 लाखांची रोख रक्कम, 1 पिस्तुल, 2 एअरगन, 10 मॅगझिन, 8 तलवारी, हमास दहशतवादी संघटनेचे 51 झेंडे, 38 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त केले.

मागच्या काही दिवसात पडघा गावाशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात ISIS सबंधित काही हालचाली तपासयंत्रणांच्या निदर्शनास आल्या होत्या. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे पडघा गावात सापडले होते. याच प्रकरणात साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांना अटक केली होती. मात्र, या सगळ्यांचा नेता असणाऱ्या साकीब नाचणला अटक करत NIA हे मोठ ऑपरेशन यशस्वी केले.

कसे केले ऑपरेशन??

या कारवाईची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती. पडघा बोरिवली हे मुस्लिम बहुल वस्तीचे ठिकाण असून मागील काही वर्षातल्या तिथल्या घडामोडी पाहता हे ऑपरेशन गुप्तपणे करणे मोठे आव्हान होते. यासाठी NIA ने महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसच्या मदत घेतली. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 2.00 वाजता संपूर्ण बोरीवली गावाला महाराष्ट्र पोलिसांनी वेढा दिला. त्यानंतर NIA आणि महाराष्ट्र एटीएसच पथक एकाच वेळी जवळपास 60 ते 70 गाड्या घेऊन गावात शिरले. एकाच वेळी मध्यरात्री झालेल्या अश्या छापेमारीमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. मात्र गावच्या सभोवताली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने ही कारवाई सुरूच राहू शकली.

NIA ने दिलेल्या संशयितांची ओळख पटवण्यात महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस मदत करत होते. त्यानुसार साकिब नाचण आणि इतर 14 जणांना NIA ने ताब्यात घेऊन ताबडतोब दिल्ली गाठली.

पडघा – बोरीवलीतच कारवाई का??

NIA च्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घाटकोपर मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकीब नाचण हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाला होता. आधी “सीमी” या दहशतवादी संघटनेशी काम करणारा साकिब नाचण यावेळी ISIS मोड्युलशी जोडला असल्याचे समोर आलं होत. साकीब नाचण स्वतःला ISIS मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता समजत होता शिवाय मुस्लिम तरुणांना ISIS आयसीस मॉड्यूलला जोडून त्यांना ‘बयात’ (आयसीसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ) घ्यायला लावत असे. काही मुस्लिम तरुणांना पडघा बोरीवली परिसरात वास्तव्यास येण्यास प्रवृत्त करत शरिया कायद्याचे पालन करत येत्या काळात देशविघातक कृत्यासाठी काम करण्याची शिकवण देत असे.

ISIS मॉड्यूलचे हँडलर्स हे परदेशातून हे सगळे मॉनिटर करत असल्याचेही तपासात समोर आले. विशेष म्हणजे पडघा बोरिवलीला ISIS ने “स्वतंत्र” जाहीर करून त्याचे नामांतर “अल् शाम” धरती बनवण्याचे साकीब नाचणचे स्वप्न होते. पण NIA ने अत्यंत वेगात अचूक धडक कारवाई करून ISIS चे मॉड्यूल उद्ध्वस्त केले.

15 Isis terrorists arrested: Accused had ‘declared’ Maharashtra village ‘liberated zone’, says NIA

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*