Strict Lockdown In India : मागच्या 24 तासांत देशात साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी इतर कोणत्याही देशातील एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दुसऱ्या लाटेतील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. या सदस्यांमध्ये एम्स आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांचा समावेश आहे. याबाबत केंद्र सरकार सोमवारी निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 days of strict lockdown in India?, Central government likely to take decision today on demand of Covid Task Force
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मागच्या 24 तासांत देशात साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी इतर कोणत्याही देशातील एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दुसऱ्या लाटेतील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. या सदस्यांमध्ये एम्स आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांचा समावेश आहे. याबाबत केंद्र सरकार सोमवारी निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागच्या आठवडाभरापासून या मागण्या टास्क फोर्सने केल्या आहेत. आयसीएमआरचा असा युक्तिवाद आहे की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप शिगेला पोहोचलेली नाही. यामुळे या परिस्थितीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक आहे.
आयसीएमआर आणि एम्सच्या मतांवर केंद्राने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 3 मेनंतर केंद्र त्यावर निर्णय घेऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. असे म्हटले जात आहे की, पूर्ण लॉकडाऊन न केल्यास सरकारकडून अंशत: लॉकडाउन जाहीर करू शकते.
देशात सध्या दररोज विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट आता मे अखेरपासून कमी होण्याची शक्यता आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी गणितीय मॉडेलच्या आधारे व्यक्त केली आहे. तथापि, यापूर्वीच म्हणजेच मे मध्यात दररोज 5 ते 6 लाख कोरोना रुग्ण समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत अफाट वाढ होईल, परिणामी देशात मोठ्या प्रमाणात बेड्स, ऑक्सिजनचा तसेच इतर वैद्यकीय सुविधांचा तुटवडा भासेल. म्हणूनच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात दोन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा, ओडिशामध्ये संपूर्ण लॉकडाऊन आहे. तर महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात वीकेंड लॉकडाऊन आहे. मध्य प्रदेशातही 7 मेपर्यंत कर्फ्यू लादण्यात आला आहे.
15 days of strict lockdown in India?, Central government likely to take decision today on demand of Covid Task Force
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App