विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीच्या दौन्यात शुक्रवारी अमूल डेअरी पॉटसह 13,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यादरम्यान त्यांनी एएका सभेला संबोधित केले.13 thousand crores worth of projects laid by PM Modi in Varanasi; Criticism of the crown princes of Congress
या वेळी मोदी यांनी कग्रिसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, कॉग्रेसचे युवराज काशीत येऊन काशीच्या तरुणांना नशेखोर म्हणत आहेत. ज्यांचे भान हरवले आहे, ते काशीतील मुलांना नावाज संबोधत आहेत. अरे घराणेशाहीवाल्यांनो यूपीचे भविष्य तरुणाई बदल आहे. काँग्रेसला प्रभू श्रीरामांचा एवढा द्वेष का आहे, हे मला माहीत नाही. मोदींना शिव्या देत देत दोन दशके घालवली आणि आता ईश्वर स्वरूप जनता, यूपीच्या तरुणाईवर आपली निराशा काढत आहेत. यूपी शंभर टक्के जागा एनडीएच्या नावे करणार आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान 20 फेब्रुवारीला रायबरेलीत सांगितले होते की, मी वाराणसीत गेलो तेव्हा रात्री संगीताच्या तालावर यूपीचे भविष्य रस्त्यावर नशेत नाच करत होते. उत्तर प्रदेशमध्ये पोलिस भरती आणि समीक्षा अधिकारी पदांच्या पेपर लीक प्रकरणी तरुणाईने आंदोलन केले, याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, लखनऊपासून प्रयागराजपर्यंत पोलिस भरती पेपर लीकबाबत युवा रस्त्यावर आहेत. तेथून १०० किमी अंतरावर वाराणसीत पीएम तरुणाईची फसवणूक करत आहेत, त्यांनी खास बनारसी शैलीत आजीलाच आजोळचे ऐकवत असल्याचे सांगितले’
दरम्यान, अमिह शहा यांच्यावर टिप्पणी प्रकरणात राहुल यांच्यावर झारखंडच्या कनिष्ठ न्यायालयात खटला चालेल, राहुल यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App