महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी आग 13 जण जखमी

9 जखमी इंदूरमध्ये दाखल, मुख्यमंत्री यादव यांनी दिली घटनास्थळी भेट 13 people injured in fire during Mahakal Mandir Bhasma Aarti

विशेष प्रतिनिधी

इंदुर : जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात सोमवारी सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागली. यात पुजाऱ्यासह 13 जण भाजले. आरतीवेळी गुलाल उधळल्याने आग भडकली. त्यावेळी मंदिरात शेकडो भाविक उपस्थित होते. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते.

दरम्यान आरती करत असलेले पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल ओतल्याचे एका जखमी सेवकाने सांगितले. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात रसायन असल्याने आग लागली असावी. गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तेथे फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्येही आग पसरली.

काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह 13 जण भाजले.

13 people injured in fire during Mahakal Mandir Bhasma Aarti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात