वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा देशातल्या सर्व दूर भागांमध्ये सकारात्मक परिणाम दिसला आहे गेल्या पाच वर्षात त्यामुळे 13.5 कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आले आहेत, असा रिपोर्ट नीती आयोगाने दिला आहे. 13.5 crore Indians move out of multidimensional poverty in 5 years
देशातल्या अर्थस्थिती आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास या रिपोर्ट मध्ये आवर्जून नमूद केला आहे. त्यातून केंद्र सरकारने देशभर राबविलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेऊन त्याचा परिणाम शास्त्रीय निकषांवर मोजला त्यातून नीती आयोगाने अनेक निष्कर्ष काढले आहेत. त्यामध्येच 13.5 कोटी लोक गेल्या पाच वर्षांमध्ये गरिबी रेषेच्या बाहेर आले आहेत, असे महत्त्वाचे निरीक्षण नीती आयोगाने नोंदविले आहे.
“नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स : अ प्रोग्रेसिव्ह रिव्ह्यू” या नावाने संबंधित रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
2015 16 या वर्षात देशातील एकूण लोकसंख्येच्या 24.28% लोक गरीबी रेषेच्या खाली राहत होते. मात्र त्यानंतरच्या 5 वर्षात गरिबीचे प्रमाण घटून आता 14.96% लोक गरिबी रेषेच्या खाली आहेत. याचा अर्थ 9.89 टक्क्यांनी गरिबीचे प्रमाण घटले आहे.
ग्रामीण भागात गरीबी रेषेखाली राहणाऱ्या लोकांचे प्रमाण 32. 59% होते ते घटून 19.28 टक्क्यांवर आले आहे.
केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थसंस्थांनी तयार केलेले वेगवेगळे आर्थिक सामाजिक निकष या आधारे गरिबीचे मोजमाप केले आहे.
यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील महिला बालमृत्यूचे प्रमाण, महिला बालके यांचे पोषण, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था यांचा स्तर, इंधन व्यवस्था, निवास व्यवस्था भोवतालचे वातावरण, बँक खाती, त्यांच्यातील व्यवहारांचे प्रमाण आदी निकष लावून गरीबीचे मोजमाप केले आहे.
त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना, जन आरोग्य योजना, सौभाग्य योजना, पोषण आहार योजना, मोफत शिक्षण योजना आदी योजनांचा या योजनांचे मूल्यमापन या अहवालात केले आहे आणि त्या आधारेच भारतात गेल्या 5 वर्षात गरिबी रेषेखालच्या जनतेचे प्रमाण घटल्याचे नीती आयोगाने अहवालात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App