वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातून पाठविण्यात आलेला ११ हजार मेट्रिक टन तांदूळ मंगळवारी कोलंबोला पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. 11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India’s aid to Sri Lanka in crisis
महागाई आणि उपासमारी यामुळे जन उद्रेक झाला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदतीची मागणी केली होती.
श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की सिंहली नववर्षाच्या उत्सवापूर्वी तांदूळ चेन ग्लोरी या जहाजाने कोलंबोला पोहोचला. उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, “भारताने गेल्या आठवड्यात श्रीलंकेलाही १६ हजार मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्यात आला.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App