विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तिरुपती येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज आंध्रप्रदेशात खळबळ निर्माण झाली. येथील रुईया रुग्णालयात सोमवारी रात्री आयसीयू विभागात ही घटना घडली.11 people died in hospital due to lack of oxygen
लिक्विड ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये पाच मिनिटांचा व्यत्यय आल्यानंतर अचानक त्याचा दाब कमी झाला यामुळे बरेचसे रुग्ण दगावल्याचे चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरी नारायण यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर नौदलाच्या पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देत उपकरणे आणि यंत्रणेची पाहणी केली. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारनेच हा खून केला असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी
आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही घोषणा केली.याआधी महाराष्ट्र तसेच अन्या काही राज्यातही अशा प्रकराच्या दुर्घटना घडल्याने अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App