वृत्तसंस्था
मुंबई : जून ते जुलै 2023 या कालावधीत मराठवाडा व विदर्भात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 1 हजार 71 कोटी 77 लाख इतकी निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठीच्या 43574.79 लाख रुपयांचा समावेश आहे.1071 crore fund for Marathwada-Vidarbha heavy rains, flood victims; Govt sanction to pay compensation upto 2 hectare
विभागीय आयुक्त, अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जून ते जुलै, २०२३ या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. त्यामुळेच आता राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी जारी केला.
मराठवाड्यात 43574.79 लाख रुपये मिळणार
छत्रपती संभाजीनगर विभागात जालना जिल्ह्यासाठी ३३.५९ लाख रुपये, परभणी २७.७५ लाख, हिंगोली १४५४.२८ लाख, नांदेड ४२०४६.६१ लाख, बीड ९.६४ लाख आणि लातूर जिल्ह्यासाठी २.९२ लाख रुपये असा एकूण ४३५७४.७९ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार २ हेक्टरच्या मर्यादेत नुकसानभरपाई देण्यात येणर आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App