विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पेठसीर गावात सुरक्षा यंत्रणांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. फैसल फयाझ, मुस्तफा शेख, रमीझ अहमद घनी अशी त्यांची नावे असून ते ‘लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत होते. 102 terrorist killed in Kashmir since year
काश्मीसर खोऱ्यात गेल्या वर्षभरात१०२ दहशतवाद्यांना मारण्यात आल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. जम्मू-काश्मीमर पोलिस, चिनार कॉर्पस, ‘सीआरपीएफ’ यांच्या संयुक्त प्रयत्न आणि काश्मिरी जनतेच्या सहकार्याने २०२१मध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खातमा केल्याचे ट्विट काश्मीसर पोलिसांनी पोलिस महानिरीक्षकांच्या विधानाचा उल्लेख करीत केले आहे.
पेठसीरमध्ये येथे लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली. पण त्यांनी पथकावर बेछूट गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून संयुक्त पथकानेही गोळीबार केला. त्याला सुरक्षा यंत्रणांनीही प्रत्युत्तर दिले.
यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्या्स यश आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून यानंतरही शोध सुरू ठेवला होता, पण तेथे आणखी दहशतवादी आढळले नसल्याने मोहीम थांबविण्यात आला. तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबरोबरच सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App