विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणारे भुवनेश्वर हे देशातील पहिले शहर बनले आहे. येथील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.100 percent vaccination in Bhuwneshwar
देशभरामध्ये २९ जुलैपर्यंत ४५ कोटींहून अधिक जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. देशातील साधारणतः सात टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर २६ टक्के लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने तेथील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. भुवनेश्वरमध्ये रविवारी ३१८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर ३१७ जण बरे झाले. तसेच येथील सक्रिय रुग्णसंख्या सुमारे अडीच हजार आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत ६५ हजार जणांना संसर्ग झाला आहे.
२०११च्या जनगणनेनुसार भुवनेश्वरची लोकसंख्या ८.३७ लाख होती. आता ती नऊ लाखांहून अधिक आहे. शहरातील सर्व प्रौढांना लसीचे एकूण १८ लाख १६ हजार डोस देण्यात आले आहेत. गर्भवती महिलांनाही लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App