देशाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार, कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ 100 स्मारके तिरंग्याच्या रंगात प्रकाशित होणार

देशातील 100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) देशातील 100 स्मारके तिरंग्याच्या रंगात प्रकाशित करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने 100 अशी स्मारकेदेखील निवडली आहेत, जी आरोग्य व्यावसायिक, फ्रंटलाइन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस बनवणारे, नागरिक यांना खरे अभिवादन देण्यासाठी तिरंग्याप्रमाणे प्रकाशित होतील. 100 monuments to be lit in tricolour to celebrate India 1 billion vaccine feat


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील 100 कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) देशातील 100 स्मारके तिरंग्याच्या रंगात प्रकाशित करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने 100 अशी स्मारकेदेखील निवडली आहेत, जी आरोग्य व्यावसायिक, फ्रंटलाइन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस बनवणारे, नागरिक यांना खरे अभिवादन देण्यासाठी तिरंग्याप्रमाणे प्रकाशित होतील.

भारताने आज सकाळी 9.47 वाजता 100 कोटीवा डोस दिला. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एका दिव्यांगालाहा डोस देण्यात आला आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सर्वात अल्पकाळात हे प्रचंड यश मिळवणारा देश भारत ठरला आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारतापुढे फक्त चीनच आहे, इतर सर्व देश भारताच्या मागे आहेत. व्यापक लसीकरण मोहीम राबवून भारताने संपूर्ण जगाला आपली क्षमता दाखवली आहे.



केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी सांगितले की, देशात कोविड -19 लसींचे 99 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत आणि देशातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला लसीकरण करण्याचे सरकारचे ध्येय आहे.

फिक्कीच्या वार्षिक ‘हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड्स’ कार्यक्रमात डिजिटल पद्धतीने संबोधित करताना पवार म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, सध्या “जागतिक वैद्यकीय उपकरणांच्या बाजारपेठेत भारत एक अग्रगण्य देश आहे.”

100 monuments to be lit in tricolour to celebrate India 1 billion vaccine feat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात