सुवर्णयुगाच्या दिशेने शतकी वाटचाल; आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला प्रथमच 100 पदके!!; मोदींचे टीम इंडियाला निमंत्रण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीन मधल्या होंगजू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चमू जे मुख्य टार्गेट घेऊन उतरला होता, ते टार्गेट आज भारत त्यांनी पूर्ण केली “अबकी बार शतक पार” अशी घोषणा करूनच भारतीय चमू आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरला होता आणि भारतीय खेळाडूंनी ती घोषणा सार्थ केली. भारतीय क्रीडा क्षेत्राची वाटचाल सुवर्णयुगाच्या दिशेने सुरू केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच 100 पदके जिंकली. भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. 100 medals for India in Asian Games for the first time

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय चमूचे अभिनंदन केले असून आपण लवकरच दिल्लीत भेटू. मला आपल्याशी संवाद साधायचा आहे,  अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

महिला भारतीय महिला कबड्डी संघाने तैवानचा 26 25 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि भारताच्या खात्यात शंभरावे पदक आले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौदाव्या दिवशी भारताने 25 सुवर्ण, 35 रौप्य, तर 40 कांस्य परके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या समारोप होणार आहे.

हॉकी, कबड्डी, तिरंदाजी, शूटिंग, अथलेटिक्स बॉक्सिंग, टेबल टेनिस, टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन आदी क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी चमक दाखविली.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी तिरंदाजी कंपाऊंडमध्ये भारताला चार पदके मिळाली. यामध्ये 2 सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंड वैयक्तिक महिला स्पर्धेत दोन पदकांनी दिवसाची सुरुवात झाली. शनिवारी अदिती गोपीचंद स्वामीने कंपाऊंड वैयक्तिक महिला तिरंदाजीमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. अदितीने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या रतिह फादलीचा १४६-१४० असा पराभव केला.

तिरंदाजीच्या कंपाऊंड वैयक्तिक महिला स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर अदिती गोपीचंद स्वामी तिच्या प्रशिक्षकासह.

त्याचवेळी भारताला याच स्पर्धेत दुसरे पदकही मिळाले. भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने सुवर्णपदक जिंकले. तिने सुवर्ण लढतीत दक्षिण कोरियाच्या सो चावोनचा १४९-१४५ असा पराभव केला. चव्हाण यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या खालोखाल पुरुषांच्या स्पर्धेत भारताला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले. ओजस प्रवीणने सुवर्ण सामन्यात देशबांधव अभिषेक वर्माचा १४९-१४७ असा पराभव केला. अभिषेकला केवळ रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कबड्डी महिला संघ सुवर्ण

भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा २६-२५ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

हॉकीमध्ये महिलांची कांस्यपदकाची लढत

पुरुष संघाने शुक्रवारी हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर उपांत्य फेरीत चीनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर महिला संघ आता कांस्यपदकासाठी जपानविरुद्ध खेळणार आहे.

कुस्तीमध्ये 4 पैलवान प्रवेश करणार आहेत

कुस्तीमध्ये दीपक पुनिया, यश तुशीर, विकी चहर आणि सुमित मलिक हे देखील आपली मोहीम जिवंत ठेवण्यासाठी लढतील. राऊंड ऑफ 16 सामन्यांनी कुस्तीपटूंची सुरुवात होईल.

एशियाडच्या 13व्या दिवशी भारताने 9 पदके जिंकली

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १३व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. दिवसाचे एकमेव सोने हॉकीमध्ये आले. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला आहे. भारताने 13 व्या दिवशी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 9 पदके जिंकली. एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली होती. पण त्यानंतर एकूण 5 पदके जिंकून भारताने पदकांचे शतक पार केले

100 medals for India in Asian Games for the first time

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात