विशेष प्रतिनिधी
श्रीनगर :जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. त्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.10 feet statue of Shivaji Maharaj embodied in snow on the occasion of Shiva Jayanti
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी श्रीनगरमध्ये कार्यरत आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील प्रदीप तोडकर हे त्याठिकाणी कर्तव्य बजावत आहेत.
त्यांनी मोठ्या कल्पकतेने यावर्षी बर्फात पुतळा साकारला होता. मुंबईचे जवान अशोक रगडे यांनीही सहकार्य केले. शनिवारी (१९) सकाळी १० वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते बफार्तील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जवानांनी सामूहिक आरती व शिवगर्जना सादर केली.
पाकिस्तानच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर मराठा बटालियनची तुकडी कार्यरत आहे. त्या ठिकाणी सध्या उणे २५ अंश इतके तापमान आहे. तरीदेखील भारतीय सैनिकांनी जिद्दीने शिवजयंती साजरी करून मराठाबाणा जपला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App