केजरीवालांच्या आग्रह मानून शरद पवार 1 ऑगस्टचा मोदींबरोबरचा कार्यक्रम टाळू शकतील??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील मोदीविरोधकांच्या I.N.D.I.A आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी शरद पवारांनी 1 ऑगस्टचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा कार्यक्रम टाळून राज्यसभेत दिल्ली संदर्भातल्या विधेयकाच्या मतदानाच्या वेळी हजर राहावे, असा आग्रह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धरला आहे. पण हा आग्रह मानून शरद पवार यांनी स्वतःच मार्गी लावलेला लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम ते टाळतील का??, असा सवाल तयार झाला आहे. 1 August : will sharad pawar be able to avoid program with Modi at the behest of arvind kejriwal??

दिल्लीतील सरकारच्या अधिकाऱ्यांना कात्री लावणारे आणि बदल्यांचे अधिकार केंद्र सरकारकडे घेणारे एक महत्त्वाचे विधेयक राज्यसभेत 1 ऑगस्ट रोजी मतदानाला येण्याची शक्यता आहे. त्यावेळी विरोधी I.N.D.I.A आघाडीची एकजूट दिसावी यासाठी शरद पवारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी राज्यसभेत हजर राहावे, असा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आग्रह आहे. मात्र त्याच दिवशी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. स्वतः शरद पवारांनीच लोकमान्य टिळक पुरस्कारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून माहिती दिली आणि त्यांचा तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी होकार मिळवला, अशी माहिती आधी पवारांनी आणि नंतर रोहित टिळकांनी दिली होती. शरद पवार हे त्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे असतील, असेही रोहित टिळकांनी जाहीर केले होते.

पण दरम्यानच्या काळात बऱ्याच घटना घडल्या. अजित पवारांचे बंड झाले. राष्ट्रवादी उभी फुटली. अजित पवार हे शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मोदीविरोधातील 26 पक्षांची I.N.D.I.A
आघाडी आकाराला आली. आता ही आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी अनेक बैठका होणार आहेत. त्यापैकी पुढची बैठक मुंबई 25 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याच्या नियोजनाची बैठक कालच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली आणि त्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते हजर होते.

या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवार मोदींबरोबरच कार्यक्रम पूर्वनियोजनानुसारच पार पडणार पाडणार की काही वेगळी भूमिका घेणार??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्याच वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधेयका संदर्भात शरद पवारांनी 1 ऑगस्टला राज्यसभेत उपस्थित राहण्याचा आग्रह धरला आहे.

 पवार – केजरीवाल संबंध

शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांचे राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर टीका करण्याची या आधी एकही संधी सोडलेली नाही. इतकेच नाहीतर यूपीए सरकार मधील सर्वात भ्रष्ट मंत्री असे “बिरुद” देखील अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांना खूप पूर्वीच “बहाल” केले होते.*

 केजरीवालांची अडचण

मात्र, आता अरविंद केजरीवाल स्वतःच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. कारण केंद्र सरकार संस्थेत आणत असलेल्या दिल्ली विधेयकाद्वारे राज्य सरकारचे अधिकार कपात होण्याचा त्यांचा दावा आहे आणि तो त्यांना टाळायचा आहे. त्यासाठी ते काँग्रेससह सर्व विरोधकांची मदत घेत आहेत आणि म्हणूनच त्यांनी शरद पवारांना 1 ऑगस्टला राज्यसभेत त्याच विधेयकावर मतदानाच्या वेळी हजर राहण्याचे आग्रह धरला आहे.

आता शरद पवार हे अरविंद केजरीवालांनी आपल्यावर केलेल्या आरोपांचा जुना इतिहास विसरून त्यांना सहकार्य करणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते पुण्यातल्या नियोजित कार्यक्रमाला हजर राहणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय 1 ऑगस्टच्या मोदी – पवार राजकीय कॉम्बिनेशनची वेगळी चर्चा देशभरात आहेच!!

1 August : will sharad pawar be able to avoid program with Modi at the behest of arvind kejriwal??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात