आपण स्टार्टअपशी संबंधित गैरसमज दूर केले पाहिजेत, असंही सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील वाढत्या स्टार्टअप्सच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेणा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘’सरकार स्टार्टअप्सच्या प्रगतीचे पालनपोषण आणि देखरेख करण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करणार आहे. कारण स्टार्टअप्सची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे.’’ Startups in the country crossed the one lakh mark Union Minister Jitendra Singh made a big statement
याचबरोबर ‘’ही यंत्रणा या स्टार्टअप्सच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवेल. याच्या मदतीने स्टार्टअपची प्रगती कशी होते आहे, हे दिसेल. ते मागे राहू नयेत त्यांना कसं जपता येईल. विशेषत: ज्या स्टार्टअप्सना सरकारकडून तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळाली आहे त्यांच्यासाठी हे पाऊल उचलले जाईल.’’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर तिसरी पिढी सत्तेवर येईपर्यंत माहिती तंत्रज्ञानामुळे जैवतंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानात खूप बदल झाले आहेत आणि समुद्र विज्ञानात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. भारत शर्यतीत आघाडीवर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली नावीन्यपूर्ण शोध घेत आहे.
प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह प्रदर्शनाच्या समारोप आणि पुरस्कार समारंभाला संबोधित करताना डॉ. सिंह म्हणाले की, आपण स्टार्टअपशी संबंधित गैरसमज दूर केले पाहिजेत, त्यापैकी एक वय संबंधित घटक आहे. मी एका शास्त्रज्ञाला निवृत्तीनंतरही स्टार्टअप उभारताना पाहिले आहे. दुसरे कारण म्हणजे उच्च पात्रता, तुम्ही फक्त एक नवोदित असणे आवश्यक आहे ज्याला सर्जनशीलतेसाठी शोध घेण्याची इच्छा आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह प्रदर्शन हे संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान मोदींनी ठरवल्याप्रमाणे, ज्यामध्ये १२ हून अधिक केंद्रीय मंत्रालये आणि विभागांनी एकत्र येऊन भव्य शो आयोजित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App