काशी विश्वनाथ धाम कॉरिडार परिसरातील ज्ञानवापी मशिदीमधील पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही कार्यवाही कडेकोट बंदोबस्तात शनिवारी 14 मे झाली. रविवारी पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने ज्ञानवापी मशीद संकुलापासून 1 किलोमीटर अंतरावरील वाहतुकीवर बंदी घातली होती. First day survey completed; But the “body language” of the lawyers of both parties
पण हे सर्वेक्षण होताना प्रसार माध्यमांनी तिथे जी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी बोलताना नेमके काय सांगितले आणि त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगत होती?? त्यातून “बराच खुलासा” होताना दिसतो आहे!!
सर्वेक्षणाचा रिपोर्ट थेट न्यायालयाला सोपवायचा आहे. तो बाहेर कोणत्याही प्रसार माध्यमांकडे उघड करायचा नाही, असे थेट कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे वकील सर्वेक्षणात नेमके काय आढळले अथवा काय सापडले?? याबाबत कायद्यानुसार मौन बाळगून आहेत. परंतु हिंदू पक्षाचे वकील आणि मुस्लीम पक्षाचे वकील या दोघांची बॉडी लँग्वेज मात्र पुरेसे स्पष्ट बोलताना दिसत आहे!!
कोणत्याही अडथळ्याविना आजचे सर्वेक्षण झाले, असे हिंदू पक्षाच्या वकिलांनी अतिशय उत्साहात सांगितले, तर मुस्लीम पक्षाचे वकील तेच सांगताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात तो त्यांच्या कामाचा भाग होता हेही विसरून चालणार नाही.
कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. सर्वेक्षणातील या बाबी उघड करू शकणार नाही. तसे प्रश्न विचारू नका, असे उघडपणे हिंदू पक्षाचे वकिलांनी पत्रकारांना सांगितले, तर आजचे सर्वेक्षण विनाअडथळा पार पडले आहे. उद्या पुन्हा सर्वेक्षण होईल एवढेच सांगून मुस्लिम पक्षाचे वकील प्रसार माध्यमांपासून बाजूला गेले. या दोन्ही घटना “पुरेशा बोलक्या” आहेत!!
बाकी सूत्रांच्या माहितीच्या आधारे ज्ञानवापी मशीद परिसरात हिंदू चिन्हे आढळली. तळघरात काही मूर्ती आढळल्या, अशा बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. प्रत्येकाने आपली बातमी एक्सक्लुझिव्ह असल्याचे सांगून ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात आणि तळघरात हिंदु चिन्हे आणि मूर्ती आढळल्याचे सांगितले आहे. मात्र अधिकृतरित्या कोणीही त्यावर बोललेले नाही. कारण कोर्टाने त्यांच्यावर बंधन घातलेले आहे.
ज्ञानवापी मशीद आणि तळघराच्या सर्वेक्षणासाठी वकील आयुक्त अजय मिश्रा, अन्य दोन वकील आयुक्त आणि फिर्यादी- प्रतिवादी बाजूचे असे सुमारे 52 लोक ज्ञानवापी मशिदीच्या आवारात गेले होते. यावेळी पाहणी पथकातील सर्वांचे मोबाईल बाहेर जमा केले होते. तसेच, या पथकाने तळघरांची व्हिडीओग्राफीही केली आहे.
सर्वेक्षणासाठी विशेष कॅमेरे – लाईटची व्यवस्था
श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात येणा-या भाविकांची कसून तपासणी करुनच प्रवेश दिला जात होता. आजूबाजूची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सर्वेक्षणासाठी विशेष कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पाच खोल्यांची व्हिडिओग्राफी करण्यात आली. राज्याचे डीजीपी आणि मुख्य सचिव सर्वेक्षणावर लक्ष ठेवत असून साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत काम केले गेले.
– 17 मे रोजी अहवाल करणार सादर
17 मे रोजी न्यायालयात अहवाल सादर करायचा असल्याने, सोमवारीही सर्वेक्षण सुरु राहणार आहे. तसेच, गरज भासल्यास 17 तारखेलाही सर्वेक्षण पूर्ण करुन न्यायालयाची परवानगी घेऊन अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App