पुणे पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाने घेतले स्वतःला पेटवून, चारित्र्य पडताळणीसाठी चकरा मारून वैतागल्याने संताप

विशेष प्रतिनिधी

पुणे : चारित्र्य पडताळणीसाठी चकरा मारून वैतागलेल्या एका तरुणाने थेट पुणे पोलीस आयुक्तालयासमोरच स्वतःला पेटवून घेतले. पेटवून घेतल्यानंतर हा तरुण थेट आयुक्तालयाच्या आत पळत गेला. गेटवरील पोलिसांनी त्याचा बचाव करीत तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.Youth setting himself on fire in front of Pune Police Commissionerate

सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे त्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याने पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीकरिता अर्ज केला होता. त्याकरिता तो आयुक्तालयात चकरा मारीत होता. त्यामुळेच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे आयुक्तलयात खळबळ उडाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमागील नेमके कारण काय आहे याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

Youth setting himself on fire in front of Pune Police Commissionerate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात