येसबॅंक, डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसले, संजय छाब्रीयांवर ईडीची टाच; कोट्यवधींची संपत्ती जप्त

वृत्तसंस्था

मुंबई : ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांवर पोहचली आहे, अशी माहिती ईडी अंमलबजावणी संचालक कार्यालयाकडून देण्यात आली.Yesbank, DHFL scam ED on Avinash Bhosale, Sanjay Chhabriya; Assets worth crores seizedफ्लॅट, जमीन जप्त

ईडीने व्यावसायिक संजय छाब्रिया आणि ईडीच्या कस्टडीतील अविनाश भोसले यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त केली. भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरुमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला. आतापर्यंत ईडीने 1827 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. छाब्रियांवर यापूर्वी सीबीआयकडून कारवाई झाली होती.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआयचा आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून हि माहीती समोर आली आहे.

लंडनमध्ये इमारत खरेदी

लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीत दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती.

Yesbank, DHFL scam ED on Avinash Bhosale, Sanjay Chhabriya; Assets worth crores seized

महत्वाच्या बातम्या