यवतमाळ – नाशिक – अहमदनगर मृत्यूचे तांडव काय सांगते? सरकारी रुग्णालयांकडचे अक्षम्य दुर्लक्ष ना…!!

नाशिक : यवतमाळ, नाशिक आणि आता अहमदनगर ही तिन्ही शहरे मोठ्या अंतरांवर वसत असली तरी यामध्ये एक दुर्दैवी साम्य समोर आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रचंड अनास्था असल्याचे हे दुर्दैवी साम्य आहे…!! Yavatmal – Nashik – Ahmednagar What does the orgy of death say? Unforgivable negligence of government hospitals … !!

यवतमाळ मध्ये लागलेल्या सरकारी रुग्णालयात आगीत १६ बालकांचा मृत्यू झाला. त्यावेळी सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होऊन फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले गेले. यानिमित्ताने सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये आणि महापालिका, पालिका रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटचा आढावा घेण्यात आला. ज्याची फलनिष्पत्ती काय झाली हे माहिती नाही.पण त्यानंतर कोरोना ऐन भरात असताना नाशिकमध्ये सरकारी रुग्णालयातच ऑक्सिजन गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा देखील महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने रुग्णालयांच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट करून कठोर उपाययोजना करण्याच्या नुसत्या घोषणा केल्या. त्याचीही फलनिष्पत्ती नेमकी काय झाली?, हे माहिती नाही. सरकारने त्यावर कोणतेही उत्तरही दिलेले दिसत नाही.

आणि आजची तिसरी अहमदनगर जिल्ह्यातली घटना. अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयात एसीला लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यावेळी देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ तेथे जाऊन रुग्णालयाच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. फायर ऑडिट करणार आहेत. पण माणसे मेली त्याचे काय…?? नातेवाईकांना नुकसानभरपाई देऊन त्यांचे आप्त महाराष्ट्राचे सरकार परत देणार आहे का…?? हा खरा प्रश्न आहे.

कोणतीही दुर्घटना झाली की नुकसान भरपाईची घोषणा करायची. सांत्वनाचे चार शब्द बोलायचे. गाड्यांचे ताफे उडवत निघून जायचे हा पायंडा गेल्या दीड वर्षात पडला आहे. यवतमाळच्या दुर्घटनेत बालकांचा मृत्यू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील असेच गाड्यांच्या ताफ्यासह मंत्र्यांना बरोबर घेऊन बालकांच्या मातांचे सांत्वन करायला गेले होते. पण नुसतेच सांत्वन करून ते परत आले असेच दिसते. कारण गेल्या दीड वर्षात ना रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले, ना त्यावर कठोर उपाययोजना झाल्या…!! हेच आजच्या अहमदनगरच्या घटनेवरून दिसून येत आहे.

यवतमाळची आग देखील एसीला लागलेल्या आगीतूनच वाढलेली दिसत होती. अहमदनगर रुग्णालयाची आग देखील एसीलाच लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षेकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचीही अतिशय गंभीर आणि घृणास्पद उदाहरणे असल्याचे दिसून येत आहे.

Yavatmal – Nashik – Ahmednagar What does the orgy of death say? Unforgivable negligence of government hospitals … !!

महत्त्वाच्या बातम्या