Yashwant Jadhav Diary : यशवंत जाधवांच्या डायरीत “मातोश्री” पलिकडच्याही हवाला रॅकेटच्या कोट्यवधींच्या नोंदी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेते मुंबई महापालिका स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रींना पन्नास लाखांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपये दिले अशा नोंदी आल्या नोंडी असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण त्यापलिकडे अतिशय महत्त्वाच्या कोट्यावधी रुपयांचा हवाला व्यवहार केल्याच्या नोंदी यशवंत जाधव यांच्या डायरीत आहेत. यामध्ये 1.75 कोटी रुपयांचे हॉटेल 20 कोटी रुपयांना विकल्याच्या तसेच 31 फ्लॅटची खरेदी आणि भाडेकरूंना प्रत्येकी 35 लाख रुपये हवाला रॅकेट मधून दिल्याच्या नोंदी देखील आढळून आल्या आहेत. यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्तांची तपासणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करत आहे. Yashwant Jadhav Diary: In Yashwant Jadhav’s diary, there are billions of racket entries beyond “Matoshri” !!

काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यशवंत जाधव यांच्या छत्तीस मालमत्ता छापे घातले होते या छाप्यात मध्ये अधिकाऱ्यांना एक डायरी मिळाली असून डायरीतून अनेक व्यवहारांची पोलखोल झाली आहे. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले. गुढीपाडव्याला “मातोश्री”ला 2 कोटी रूपये दिले. “मातोश्री”ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील “मातोश्री” हा उल्लेख आपल्या आईचा असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. त्यातून मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू दिल्या. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला, पण दुसरीकडे ठाकरे परिवाराच्या घराचे नावही “मातोश्री” असल्याचा “योगायोग” आहे. त्यामुळे या उत्तरावर अधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याचे समजते.



– 15 कोटींचा व्यवहार, 30 कोटींचे कंत्राट

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाल्या आहेत. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोलकाता येथील प्रधान डिलर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीसोबतच्या व्यवहाराचा उल्लेख आहेत. या कंपनीने त्यांना 15 कोटी रुपये दिलेत. जाधव आणि कुटुंबाने यातून भायखळ्यातील एका इमारतीत गुंतवणूक केली. कालांतराने जाधव कुटुंबाने हे पैसे कंपनीला परत केले. त्यानंतर कंपनीने हे पैसे न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत केले. मुंबई महापालिकेच्या तब्बल 30 कोटी रुपयांच्या अनेक कंत्राटांसाठी यशवंत जाधव यांनी बिमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे.

31 फ्लॅटची खरेदी, हवालातून पैसे!!

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायवेट लिमिटेडच्या माध्यमातून कथितपणे भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅटची खेरदी केली. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिले. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. शिवाय आयकरने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरू केलाय. त्या मालमत्ताही जाधव यांच्या असल्याचा संशय आहे.

1.75 कोटीचे हॉटेल 20 कोटींना विकले

यशवंत जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यातील इम्पिरियल क्राउन या हॉटलेची खरेदी केली होती. हे हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडियाने किरायाने घेतले होते. त्यानंतर न्यूजहॉकला मुंबई महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरचे कंत्राट मिळाले. या हॉटेलची खरेदी 1.75 कोटीला झाली होती. मात्र, विक्री तब्बल 20 कोटींच्या जास्त किमतीला झाली. या व्यवहारातील प्रधान डिलर्स प्रायवेट लिमिटेडची भूमिकाही चौकशीच्या फेऱ्यात आहे.

अनेक कंत्राटे स्कॅनर खाली

यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच्या काळात घेतलेल्या कंत्राटांची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मागवली आहे. शिवाय कंत्राटदारांची माहिती आणि त्यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या पैशाची सविस्तर माहिती मागवली आहे. याच्या तपासानंतर जाधव यांनी केलेले सगळे हवाला व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.

Yashwant Jadhav Diary: In Yashwant Jadhav’s diary, there are billions of racket entries beyond “Matoshri” !!

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात