विशेष प्रतिनिधी
पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मागील काही वर्षांपासून मनरेगाची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील यासाठी किसान सभेचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी तळेघर ते घोडेगाव पर्यन्त श्रमिकांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली काढलेली पदयात्रा व यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार Work on Patan to Balvirwadi road started in AmbegaonEfforts of Kisan Sabha for works under MGNREGA
रोहयो उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते यांची पार पडलेली बैठक, या बैठकीनंतर आंबेगाव तालुक्यात अधिकाधिक कामे शेल्फ वर आणणेसाठी प्रशासनाने व विशेषतः गटविकास अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.
नुकतेच किसान सभेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन गावनिहाय कोणती कामे सुरू करता येईल याबाबत सकारात्मक चर्चा केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पाटण ते बालवीरवाडी रस्त्याचे काम,मनरेगा अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
याबद्दल किसान सभा आंबेगाव तालुका समितीने पिंपरी-पाटण ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता वडेकर, उपसरपंच के.डी पारधी,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व पंचायत समिती,आंबेगाव मधील सर्व मनरेगा टीम या सर्वांचे विशेष अभिनंदन किसान सभा,आंबेगाव तालुका समितीने केले आहे.
किसान सभा,आंबेगाव तालुका समितीचे अध्यक्ष,कृष्णा वडेकर,सचिव,अशोक पेकारी,सुभाष भोकटे,लक्ष्मण मावळे,देविका भोकटे,दत्ता गिरंगे,रामदास लोहकरे यांनी या भागात मनरेगाची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील,यासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App