आपल्या 3 वर्षच्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली


विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाला विष देऊन संपवल्याबद्दल पुण्यातील एका महिलेला आजन्म कारावासाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली आहे. स्वाती विक्रम मालवणकर (वय – 29) असे या मातेचे नाव आहे. रुपीनगर निगडी येथे ती राहत होती. 2 ऑगस्ट 2016 रोजी तिने आपल्या मुलाला विष देऊन संपवले आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सेक्शन 302, 328 आणि 309 इंडियन पीनल कोड अंतर्गत तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Woman sentenced to life imprisonment for attempting suicide after killing her 3-year-old son

24 सप्टेंबर 2016 रोजी तिची जामिनावर तुरूंगातून सुटका करण्यात अाली होती. पब्लिक प्रॉसिक्युटर लीना पाठक यांनी सांगितलेल्या वृत्तानुसार, स्वाती हिला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे नव्हते. त्यावरुनच वारंवार घरामध्ये भांडण द्यायचे. म्हणून तिने स्वत:ला आणि आपल्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तिने हा प्रयत्न केला त्यावेळी तिचा नवरा विक्रम घरी नव्हता. या दोघांचे लग्न 3 मे, 2013 रोजी झाले होते.

ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा स्वातीचा नवरा विक्रम याने त्याचा भाऊ श्रीकांत याला फोन करून सांगितले की, घरी जाऊन स्वाती ठीक आहे का नाही हे चेक करून ये. कारण ती फोन उचलत नाहीये. जेव्हा त्याचा श्रीकांत घरी पोहोचला, तेव्हा स्वाती आणि तिचे लहान बाळ जमिनीवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. तर तिची साडी बेडरूममधील फॅनला बांधली होती.


अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी सपा सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापतीसह तिघांना जन्मठेप, 2 लाखांचा दंडही


श्रीकांतने तातडीने त्यांना दवाखान्यांमध्ये अॅडमिट केले. हॉस्पीटलमध्ये बाळाला मृत घोषित करण्यात आले. तर स्वातीची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. आणि म्हणून तीला वाचविण्यात आले. आपल्या मुलाच्या खिशामध्ये तिने मृत्यूबाबतची नोट लिहून ठेवली होती.

20 ऑगस्ट 2016 रोजी निगडी पोलिसांनी एफआयआर दाखल केली आणि स्वातीला अटक केली. त्याचप्रमाणे घरातून त्यांनी इन्सेक्टिसाइ जप्त केले होते. कोर्टामध्ये केस चालू असताना स्वातीने आपल्या सासरच्या लोकांविरूद्ध घरेलू हिंसाचाराची केस दाखल केली होती. पण कोर्टात ह्या आरोप सिद्ध करता आले नाहीत. तिने केलेले सर्व आरोप निष्फळ आहेत असे कोर्टामध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे तिला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

Woman sentenced to life imprisonment for attempting suicide after killing her 3-year-old son

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण