विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्या प्रकरणी सभागृहात बिनशर्त माफी मागितली आहे. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यावरून विधानसभेत गोंधळ झाला.Winter Session: Bhaskar Jadhav’s unconditional apology for copying PM Modi; He also accepted the challenge of Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व आमदारांनी भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच भास्कर जाधव माफी मागायला तयार नसतील तर त्यांचं निलंबन करण्यात यावं अशीही मागणी केली.
गदारोळ इतका वाढला होता की कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.
सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी हे सांगितलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्यच आहे. कुठल्याही पक्षाचे नेते असतील त्यांची नक्कल किंवा त्यांच्याबद्दल असंसदीय शब्द, वर्तन हे होता कामा नये.
यानंतर भास्कर जाधव बोलायला उभे राहिले. भास्कर जाधव म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी शब्दच्छल केला होता. तेच मी सांगत होतो. मी ज्यावेळी बोलत असतो तेव्हा कधी कधी अंगविक्षेप माझ्याकडून होतो. आजही तो झाला,
त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. तसंच देवेंद्र फडणवीस जो काही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहेत त्याला सामोरा जायला मी तयार आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App