राऊतांचं वक्तव्य सरकारचं अपयश झाकण्यासाठी, दानवेंची भास्कर जाधवांवरही टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर पलटवार केला. दानवे म्हणाले की, वेस्टर्न कोलफील्डसचा कोळसा हा निष्कृष्ट नाही, शिवाय महागही नाही. Raut’s statement to cover up the government’s failure

राज्य सरकार केवळ 3 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करते. प्रत्यक्षात मागणी 25 हजार मेगावॅटची आहे. राज्य सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी अशी विधाने करत आहे. इतर राज्यांनाही डब्ल्यूसीएलमधून कोळसा पुरवठा होतो, पण तिथून तक्रार आलेली नाही. प्रत्यक्षात या लोकांनी स्वस्त विजेची आश्वासने दिली, पण त्यांना ती पूर्ण करता आलेली नाहीत.

याशिवाय भास्कर जाधव यांच्या चिपळूण दौऱ्यातील वर्तनावर दानवे म्हणाले की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला असे वर्तन शोभत नाही. लोकांच्या भावनांचा उद्रेक होणं साहजिक आहे. मायबाप सरकार समजून लोकं गाऱ्हाणं मांडत असतात.

भास्कर जाधवांची वागणूक ही पक्षाची वागणूक आहे. फडणवीसांच्या काळात आपत्तीच्या वेळी फडणवीस रात्रभर बसून लक्ष ठेवून होते. ठाकरे सरकारला तीन दिवस लागले. महाराष्ट्राचे सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरलंय.

Raut’s statement to cover up the government’s failure