सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : अण्णा हजारे संतप्त; तर नांदेडच्या शेतकऱ्याचा गांजा शेतीसाठी मुख्यमंत्र्यांना इ-मेल!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुपर मार्केट किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या ठाकरे – पवार सरकारवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतप्त झाले आहेत. संविधानानुसार जनतेला दारूमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची असताना सरकार उलट्या दिशेने चालले आहे. जनतेला व्यसनी बनवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. Wine sales in supermarkets: Anna Hazare angry; So e-mail to CM for Nanded farmer’s cannabis cultivation !!

राज्य सरकारला उत्पन्न वाढीसाठी अनेक वैध इतर मार्ग उपलब्ध असताना ते शॉर्टकट मारून जनतेला दुःखातच लोटत आहेत. दारूचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाने भोगल्यानंतर महात्मा गांधींनी दारूबंदीसाठी आयुष्यभर आग्रह धरला आणि आताचे सरकार लोकांना दारूचे व्यसन जडवायला लागले आहे, असे टीकास्त्र अण्णा हजारे यांनी सोडले आहे. दारू आणि वाईन यात फरक असल्याची मखलाशी राज्यांमध्ये अनेक मंत्री करत आहेत त्यावर देखील अण्णा हजारे यांनी टीकेचे आसूड ओढले आहेत.



एकीकडे अण्णा हजारे यांनी ठाकरे – पवार सरकारला घेरले असताना दुसरीकडे नांदेडच्या एका शेतकऱ्याने जर वाईन ही शेतकऱ्यांच्या हिताची असेल तर गांजा शेती का नाही?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना गांजा शेतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारा इ-मेल पाठवला आहे

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका केली असता, राज्य सरकारच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की, हा निर्णय शेतक-यांच्या हिताचा आहे. शेतक-यांच्या द्राक्षांना या निर्णयामुळे मागणी वाढणार आहे. आता सरकारच्या याच निर्णयावर टीका करत, एका शेतक-याने गांजाची शेती करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना इ-मेल करुन परवानगी मागितली आहे.

नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात इ-मेल केला आहे. राज्यातल्या शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यात कोविड आणि काही विभागात कडाक्याची थंडी आणि गारांचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतक-यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी मेलमध्ये नमूद केले आहे.

Wine sales in supermarkets: Anna Hazare angry; So e-mail to CM for Nanded farmer’s cannabis cultivation !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात