‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.Why should the central agency believe the allegations of Parambir who fled the country? – Jayant Patil
विशेष प्रतिनिधी
नाशिक : अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तिथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे.
लोकांची दिशाभूल करून सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे,’ असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App