विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीच्या मुंबईतील एका नगरसेविकेचा पती मोहसीन शेख सध्या ठाकरे कुटुंबाचा लाडका बनला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याचा बक्षीस देऊन सत्कार केला आहे. मोहसीन शेखने केलेल्या एका खास कामगिरीमुळे त्याला हे बक्षीस मिळाले आहे.Why Mohsin Sheikh, husband of NCP corporator, has become the darling of Thackeray family!
मोहसीन शेख याने काही विधायक काम केले म्हणून नाही तर राडा केल्याने हा मानसन्मान मिळत आहे असे नाही. तोही साधासुधा नाही तर तर त्याने चक्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर राडा केला आहे.
मोहसीनशेख याने २०१७ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून युवासेनेत प्रवेश केला. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. राणे-सेना आंदोलावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.
युवासेनेच्या कार्यकत्यार्ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून बक्षीस मिळाले. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोहसीन यांचं अभिनंदन करणारं ट्विट केले आहे.
नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं.
आमदार नितेश राणे यांचे आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली. यात मोहसीन आघाडीवर होता.मोहसीन शेख यांची पत्नी राष्ट्रवादीची मानकूर शिवाजीनगरची नगरसेविका आहे. मोहसीन शेख यांनी राष्ट्रवादीतून 2017 ला शिवसेनेत प्रवेश केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App