प्रतिनिधी
मुंबई : बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत, त्याच भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांवर दीपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून, या आरोपाला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याच वेळी त्यांनी ठाकरे – पवार मैत्रीचा दावाही केला आहे. While replying to Deepak Kesarkar, NCP claims friendship with Balasaheb-Pawar
देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे, तर शरद पवार यांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचा दावा महेश तपासे यांनी केला आहे. पण बाळासाहेबांची पवारांशी व्यक्तिगत मैत्री होती, त्यांनी कधीच पवारांशी राजकीय युती किंवा आघाडी केली नाही, याचा सोयीस्कर विसर महेश तपासेंना पडला.
– बाळासाहेब – पवार मैत्री सर्वश्रुत
शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दीपक केसरकर यांना माहीत नसावी, असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. याची आठवणही महेश तपासे यांनी दीपक केसरकर यांना करुन दिली आहे.
जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झिडकारले त्यावेळी पवारसाहेबांनी शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App