विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कपात केली पण महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनामुळे उत्पन्न घटले असून पगार देण्यासाठीही कर्ज काढावे लागते आहे.
When will petrol be cheaper in Maharashtra?
गेले काही दिवस पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढले होते. सामान्य लोकांना केंद्राने इंधन करात कपात केल्याने दिलासा मिळाला. पण तरीही महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी शंभर ₹ वर आहेत. राज्य सरकारने व्हॅट व इतर कर कमी करावे अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की कर कमी करता येणार नाहीत. केंद्र सरकारने जीएसटीची ५० हजार कोटीची रक्कम दिलेली नाही. इगतपुरी तालुक्यातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात प्रभातफेरी झाली. त्यावेळी झालेल्या सभेनंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते. इंधन दरवाढीचा आम्ही विरोध केला आहे. केंद्र सरकारने करात वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचे ५०हजार कोटी केंद्राने दिले नाहीत. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले आहे. पगार देण्यासाठीही कर्ज उचलावे लागते आहे असे थोरात म्हणाले.
Petrol Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, लवकरच भारतात पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
एसटी आंदोलन भाजपा पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे. भाजपाचे तत्कालीन मंत्री म्हणाले होते की एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेता येणार नाही. आता भाजपा आंदोलन करत आहे असेही थोरात म्हणाले.
एसटीच्या खाजगीकरणा बाबत आम्हाला अधिकृत माहिती नाही असे ते म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब हे स्वतः एसटी आंदोलनात लक्ष घालत आहेत. कर्मचाऱ्यांना कोरोना काळात पगार दिले व बोनसही दिला आहे असे थोरात म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App