रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्था याच्या गणितात काही अडचणी निर्माण झाल्या तर मात्र नाइलाजास्तव योग्य निर्णय घेतले जातील. When to close the theater depends on the intensity of the third wave – Medical Education Minister Amit Deshmukh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित केली होती.यावेळी अमित देशमुख म्हणाले की ,राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाटय़ाने वाढताना सध्या दिसत आहे.पण थिएटर बंद करण्याचा आता विचार नाही. पण तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर हे अवलंबून आहे.
रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्था याच्या गणितात काही अडचणी निर्माण झाल्या तर मात्र नाइलाजास्तव योग्य निर्णय घेतले जातील.तसेच येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठात्यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे तसेच नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करून घ्यावे,अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App