नेमक खर काय ,अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांनी वानखेडेंवर साधला निशाणा


याआधी देखील मलिक यांनी अनेक पुरावे दिले आहेत. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. What exactly, Muslims for funerals and Hindus for government documents? Nawab Malik aims at Wankhede


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे.दरम्यान नवाब मलिक यांनी एक ट्विट करून बॉम्ब फोडला आहे.यावेळी मलिक म्हणले की ,अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव, असे ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रे शेअर केली आहेत.

यामध्ये महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी ट्विट केली आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

याआधी देखील मलिक यांनी अनेक पुरावे दिले आहेत. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याआधी नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत. ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असे आहे. यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

What exactly, Muslims for funerals and Hindus for government documents? Nawab Malik aims at Wankhede

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण