हवामान अलर्ट : या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी, राज्यात आतापर्यंत पावसाचे 99 बळी


वृत्तसंस्था

मुंबई : आज महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, पुणे आणि सातारा येथे पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.Weather Alert Orange and Yellow Alert issued for rains in these districts, 99 rain victims so far in the stateआतापर्यंत ९९ जणांनी गमावला जीव

महाराष्ट्रात पावसामुळे NDRF आणि 6 SDRF च्या एकूण 14 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनानुसार, गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 99 वर पोहोचली आहे. 181 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 7,963 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्रात मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हा दंडाधिकारी मैदानात आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

चालकांना गुजरातच्या दिशेने न जाण्याचा सल्ला

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी माहिती दिली की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लहान वाहनांना परवानगी दिली जात नाही आणि इतर सर्व वाहनधारकांना शेजारील राज्यातील रस्ता मोकळा होईपर्यंत गुजरातच्या दिशेने न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये गेल्या २४ तासांत सरासरी २२२.३१ मिमी पाऊस झाला आहे. ते म्हणाले की, मोखाड्यात 296.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत 1,460.9 मिमी पाऊस झाला आहे.

Weather Alert Orange and Yellow Alert issued for rains in these districts, 99 rain victims so far in the state

महत्वाच्या बातम्या 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण