हवामान : महाराष्ट्रात थंडीच्या लाटेपासून तूर्तास दिलासा नाही, पुढील तीन दिवस थंडीबाबत हवामान खात्याचा इशारा

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही कडाक्याची थंडी कायम आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी वाढली आहे. थंडीच्या लाटेपासून दिलासा न मिळाल्याने हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत कडाक्याची थंडी आहे. रात्री थंडीच्या लाटेचा प्रभाव असला तरी थंड वाऱ्यांमुळे दिवसाही थंडीचा कडाका कायम आहे. मध्य प्रदेशातील पचमढी येथे शुक्रवारी तापमान एक अंश सेल्सिअस नोंदवले गेले. Weather Alert No relief from cold wave in Maharashtra, meteorological department warns of cold for next three days


वृत्तसंस्था

मुंबई : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही कडाक्याची थंडी कायम आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी वाढली आहे. थंडीच्या लाटेपासून दिलासा न मिळाल्याने हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत कडाक्याची थंडी आहे. रात्री थंडीच्या लाटेचा प्रभाव असला तरी थंड वाऱ्यांमुळे दिवसाही थंडीचा कडाका कायम आहे. मध्य प्रदेशातील पचमढी येथे शुक्रवारी तापमान एक अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात ताशी 10-20 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. मध्य प्रदेशातील विविध भागात थंडीची लाट कायम राहणार आहे. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमधील एकाकी भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील 3-4 दिवस थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही.

या भागात पाऊस पडू शकतो

हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD नुसार, पुढील 4 दिवसात तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो.

Weather Alert No relief from cold wave in Maharashtra, meteorological department warns of cold for next three days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात