WATCH : कोणी कसं लढायचं योग्य वेळी ठरवू – संजय राऊत


Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना भाजप युती होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एका घट्ट नात्याने जोडलेले आहेत, प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा विस्तार करतो, आम्हीसुद्धा करतो. कोणी कसं लढायचं याबाबत चर्चा आताच झाली नाही, योग्य वेळी त्याबाबत ठरवू. तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे, हे सरकार पाच वर्षे चालवायचं. तीन पक्षाचा समन्वय हे एक आदर्श समन्वयाचा उदाहरण आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, प्रताप सरनाईक करण्याचे पत्र लिहिले त्याबाबत आमदारच सांगू शकतात. ते त्रासात आहेत, अडचणीत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे कारण त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट लिहिल्याचंही राऊत म्हणाले. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे, असं पत्रमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. या त्रासातून सुटका म्हणून आपण मोदींशी जुळून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांचं मत झालं, मात्र पक्षाची भूमिका हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करून ठरवली आहे आणि तेच निर्णय घेण्याचे अधिकारी आहेत. या संकटाशी कसा सामना करायचा, त्यासाठी सरनाईक यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले की, समन्वयाचा अभाव आहे असं मला तरी वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. विनाकारण त्रास का होतो, याची कारणं सरनाईक यांनी पत्रात दिली आहेत. त्याचा अभ्यास मीडियाने आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी करायला हवा. विनाकारण त्रास याआधी तृणमूल काँग्रेसने अनुभवलेला आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीसुद्धा अनुभवला आहे. या पक्षामध्ये आम्ही आज काम करत नाही आहोत, आमचे केस पांढरे झाले आणि आता परत काळे करतोय. फार फार तर काय कराल तुरुंगात टाकलं. तुरुंगात जायची तयारी आहे. महाभारतातले योद्धे आम्हीच आहोत आणि त्यात माझं नाव संजय आहे. आज योग दिवस आहे. विरोधकांना शवासनाचा सल्ला देईल. WATCH Shiv sena MP Sanjay Raut Reaction On Congress Election Strategy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात