WATCH : सांगलीत ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलांचे जिगरबाज युवकांनी वाचवले प्राण

Watch Sangli Youth Saves three Women From Drowning In Flood

Sangli Youth Saves three Women From Drowning : सांगली जिल्ह्याच्या पाच्छापूर येथील सात महिला वळसंग येथे काल शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. दुपारी काम संपवून त्या पाच्छापूर येथे येत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे पाच्छापूर येथील ओढा दुथडी भरून वाहू लागला. शेतातून घराकडे पायी जाणाऱ्या या महिला एकमेकींचा हात धरून पाण्यातून वाट काढत होत्या. तेवढ्यात या तिघींचा हात सुटल्याने त्या वाहून जाऊ लागल्या. त्या वाहून जात असल्याचे पाहून सोबतच्या महिलांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील तरुणांनी तेथे धाव घेतली. तरुणांनी पाण्यात उतरून या तिन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढले. हे तरुण वेळेवर धावून आले नसते तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर तरुणांच्या धाडसाचेही कौतुक करण्यात येत आहे. Watch Sangli Youth Saves three Women From Drowning In Flood

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी