Maharashtra Assembly Election : २०२२ हे वर्ष भारताच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आठ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निकालांचा थेट परिणाम केंद्राच्या राजकारणावर होईल. या आठ राज्यांपैकी सहा राज्यांत भाजपचे सरकार आहे. यापैकी पंजाब हे एकमेव असे राज्य आहे, जेथे भारतातील मुख्य विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेसचे सरकार आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा संपुष्टात आणल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर तेथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे नाव समाविष्ट नाही. परंतु महाराष्ट्रातही पुढच्या वर्षी निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये घेण्यात आल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळाले. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या अट्टहासापायी शिवसेनेने अनेक दशकांचे भाजपशी असलेले संबंध तोडले. यामुळे आता पुढच्या वर्षी का निवडणुका होऊ शकतात जाणून घ्या या व्हिडिओतून… WATCH Possibility Of Maharashtra Assembly Election in 2022
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App