Why can't you get a slot even after registeration on CoWin, Explained By CoWin Chief RS Sharma, read in details

लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…

CoWin Chief RS Sharma : कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण अभियानाचा विस्तार करण्यात आला आहे. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. यासाठी 28 एप्रिलपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. यात 18 ते 44 वयापर्यंतच्या सर्वांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि, काही युजर्सना नोंदणी केल्यावर 45 वर्षांखालील व्यक्तींसाठी लस देणारे एकही हॉस्पिटल आढळून आले नाही. ही समस्या का उद्भवली आहे, केव्हा याचे निराकरण होईल, याबाबत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ आरएस शर्मा यांनी उत्तरे दिली आहेत. Why can’t you get a slot even after registeration on CoWin, Explained By CoWin Chief RS Sharma, read in details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण अभियानाचा विस्तार करण्यात आला आहे. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. यासाठी 28 एप्रिलपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनला (Corona Vaccine Registration ) सुरुवात झाली. यात 18 ते 44 वयापर्यंतच्या सर्वांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी चार वाजता कोविन अॅपवर (Co-Win App) नोंदणीला सुरुवात होताच थोड्याच वेळात सर्व्हर क्रॅश झाल्याचे दिसून आले. अनेकांना ओटीपीही (OTP) येत नव्हता. तथापि, थोड्यावेळाने ही समस्या दूर झाली. नोंदणीला सुरुवात झाल्याच्या एका तासातच तब्बल 35 लाख लाभार्थींनी नोंदणी केल्याची माहिती कोविन प्रमुख आरएस शर्मा यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

तथापि, काही युजर्सना नोंदणी केल्यावर 45 वर्षांखाली व्यक्तींसाठी लस देणारे एकही हॉस्पिटल आढळून आले नाही. हे समस्या का उद्भवली आहे, केव्हा याचे निराकरण होईल याबाबत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (National health Authority) सीईओ आरएस शर्मा यांनी उत्तरे दिली आहेत.

राज्यांवर अवलंबून आहेत स्लॉट्स

शर्मा म्हणाले की, लसींचे स्लॉट्स (Vaccine Appointment Slots) हे राज्यांवर आणि खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. जेव्हा राज्ये आणि खासगी रुग्णालये त्यांची केंद्रे, लसीच्या किमती इत्यादी माहितीसह पोर्टलवर येतील, तेव्हा लोकांना लसीसाठी अपॉइंटमेंट बुक करता येईल. काही राज्ये आणि रुग्णालये 1 मे किंवा त्यानंतर या पोर्टलवर येण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, बुधवारी रजिस्ट्रेशनची सुरुवात होताच, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोव्हिशील्ड लसीच्या किमतीत कपातीची घोषणा केली आहे. राज्यांना ही लस आता 400 रुपयांऐवजी 300 रुपयांत मिळू शकेल. यामुळे अने राज्ये सध्या उत्पादकांकडे लसींची मागणी नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहेत. जेव्हा ते तयार असतील, रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना स्लॉट्स दिसायला लागतील.

रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट बुकिंगमधला फरक जाणून घ्या…

अनेक युजर्सना मोबाइलवरील ओटीपीच्या माध्यमातून बुधवारी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता आले. रजिस्ट्रेशनसाठी एखाद्या व्यक्तीला आपला फोटो आयडी उदा. आधारचा उल्लेख करावा लागतो. जो फोटो आयडी वापरला आहे, त्यावरील क्रमांक (उदा. आधार क्रमांक), कार्डावरील नाव, लिंग, जन्माचे वर्ष इत्यादी माहिती भरावी लागते. ही माहिती भरताच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया संपते.

यानंतर कोविन पोर्टलवर जेव्हाही तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला पुन्हा ओटीपीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. परंतु एकदा रजिस्ट्रेशन झालेले असेल तर लस घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुकिंगकडे जाता येते.

यावर आरएस शर्मा म्हणाले की, जेव्हा राज्ये किंवा रुग्णालये या पोर्टलवर येतील तेव्हा आम्ही वेळोवेळी घोषणा करू. ही प्रोसेस अद्याप सुरू आहे. यामुळे आमचा लोकांना सल्ला आहे की, जेव्हा लस उपलब्ध असतील तेव्हाच अपॉइंटमेंट बुक करा.

कोविन पोर्टल एवढा लोड सहन करेल का?

कोविन वेबसाइट बुधवारी काही वेळासाठी क्रॅश होण्याच्या आधी आरएस शर्मा एएनआयला म्हणाले होते की, कोविन अॅपवर एका दिवसात 50 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आणि हा प्लॅटफॉर्म दुप्पट संख्येच्या क्षमतेसाठी तयार करण्यात आला आहे. बुधवारी केवळ एका तासात 35 लाख जणांनी नोंदणी केली. यावेळी पोर्टलने दीड तासात 87 लाख एसएमएस पाठवले, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या रुग्णालयांचा कोविनवर उल्लेख का नाही?

1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या रुग्णालयांतही मोफत लसीकरण असेल. येथेही 18 ते 44 वयादरम्यान असलेल्या सर्वांना मोफत लस मिळेल. या रुग्णालयांमध्ये ऑनलाइन स्लॉट बुकिंगची सोय नसेल.

Why can’t you get a slot even after registeration on CoWin, Explained By CoWin Chief RS Sharma, read in details

महत्त्वाच्या बातम्या